लॉकडाउनच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांचे चक्क भीक मागो आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-राज्यसरकारने लावलेल्या वीकेंड लॉकडाउन आणि राज्यात लागू केलेल्या कडक निर्बंध याविरोधात आज भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील पोवाईनाका येथे भिक मागो आंदोलन केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होतं.

मात्र, या लॉकडाउनला खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सातारा येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन ‘भीक मागो आंदोलन’ करत त्यांनी लॉकडाउनचा निषेध केला.

उदयनराजेंनी सांगितले की, ही टाळेबंदी आम्हाला नको आहे. आमची जनता काय उपाशी मरणार का? जर पोलिसांना जनतेचा उद्रेक पाहावा लागला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचाही निषेधही नोंदवला.

तसेच, उद्यापासून नो लॉकडाउन असे देखील उदयनराजेंनी आपल्या स्टाईल बोलून दाखवले. आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं असंही उदयनराजेंनी बोलून दाखवलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe