मारहाण झालेल्या त्या रिटायर्ड सैनिकाचा अखेर मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हॉटेल समोरील वाहन बाजूला लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत रिटायर्ड सैनिकाचा शनिवारी (दि.१०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे शुक्रवारी (दि.९) घडला होता. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१, फुंदेटाकळी, रा.पाथर्डी) असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

मयताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे (रा.फुंदेटाकळी) यांच्या फिर्यादीवरून सुधीर संभाजी शिरसाटसह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विश्वनाथ फुंदे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या साईप्रेम हॉटेल येथे होते. त्यावेळी सुधीर संभाजी शिरसाट याने त्याचे वाहन हॉटेलसमोर लावलेले होते.

विश्वनाथ फुंदे यांनी हॉटेल समोरून वाहन दुसरीकडे लावा, असे शिरसाट यांना सांगितले. याचा राग शिरसाट याला आला. त्याने त्याच्या आठ साथीदारांना बोलावून घेऊन विश्वनाथ फुंदे यांना लोखंडी पाइप व रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांना बळजबरीने चारचाकी वाहनातून दुसरीकडे नेले. बाहेर नेऊन त्यांना मारहाण केली. ते गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe