अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दरदिवशी बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यातच शनिवारी नगर जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा 2 हजारांच्या पुढे आला.
यामध्ये नगर शहरात सर्वाधिक करोना रुग्ण आढळले असून 9 तालुक्यात बाधितांच्या आकड्याने शतक गाठले.
दरम्यान जिल्ह्यातील उपचार घेणार्या सक्रीय रूग्णांची संख्या 12 हजारांवर पोहचली आहे. दरम्यान, शनिवारी 1 हजार 996 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत करोनावर मात करणार्यांची संख्या 1 लाख 290 आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 88.26 टक्क्यांवर घसरले आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 हजार 210 करोनाबाधितांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 960, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 484 आणि अँटीजेन चाचणीत 766 रुग्ण बाधीत आढळले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|