अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या कोरोना विषाणूने सर्वाना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरु ठेवले असून, आता या विषाणूच्या तावडीतून सरकारी कर्मचारी देखील सुटले नाही.
नुकतेच महसूल विभागातील 96 अधिकारी-कर्मचार्यांना करोनाने घेरले आहे. यातील 55 जणांनी करोनावर यशस्वी मात केली असून अद्याप 39 जणांचा करोनाशी लढा सुरू आहे.
जिल्ह्यात करोनाच्या दुसर्या लाटेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाशी समन्वयाची भूमिका ठेवून काम करणारा महसूल विभागही करोनाच्या विळख्यात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल शाखेत 2, भूमापन शाखेत 1, सामान्य प्रशासन विभागात 3, पुरवठा विभागात 1, पुर्नवसन विभागात 2, निवडणुक विभागात 1, जिल्हाधिकारी यांच्या स्विय साहयक कक्षात 1, नगरपालिका विभागात 3 असे करोना बाधित असून
यापैकी 55 जणांनी करोनावर मात केली असून 39 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
मात्र तरीही कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. यातच राज्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|