‘…तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडीसीवीर इंजेक्शनबाबत तत्काळ उपाययोजना करून पुरवठा सुरळीत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यास काळे फासू, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला आहे.

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवीरचा इंजेक्शनचा नगर शहरात तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.

याचाच जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात शुक्रवारी गेले असता तेथे अधिकारी उपस्थित नव्हते.

तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, विशाल वालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!