लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद ! फक्त अत्यावश्यक सेवा सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राज्य शासनाने जारी केलेल्या विकेंड लॉकडाऊनला शहरासह ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळाला.

नेवासे शहरासह सोनई, भेंडा, कुकाणे, घोडेगाव, वडाळा या प्रमुख गावांसह नेवासा तालुक्यातील विविध गावात कडकडीत विकेंड लॉकडाऊन पाळण्यात अाला.

तालुक्यात अत्यावश्यक सेवेत असलेले हॉस्पिटल व मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले.

तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर नागरिकही फिरताना दिसून येत नाही. नेवासे शहरातील मुख्य चौक खोलेश्वर गणपती मंदिरासमोर सकाळपासून पोलिस व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा

यांनी नागरिकांना रस्त्यावर न फिरण्याच्या व संचारबंदीची लागू असल्याच्या सूचना करत होते. पोलिस तसेच प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नेवासे तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दररोज काेरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.

त्यामुळे विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांकडून काटेकोर पालन होताना दिसून आले. नेवासे तालुक्यामध्ये कोराेना रुग्णांची संख्या रोज पन्नास ते साठ रुग्णांनी वाढत आहे.

तालुक्यातील काेराेना रुग्णाांची संख्या चार हजार पार झाली अाहे. तालुक्यात भेंडे येथील कोरोना सेंटर वगळता कोणतेही शासकीय कोविड सेंटर नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकंची धावपळ होत आहे. अनेक जण खासगी दवाखाने अथवा घरीच क्वारंटाईन होणे पसंत करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe