स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दहा लाखांना लुटले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-पुणे येथील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलवुन पंधरा ते वीस जणांच्या टोळीने दहा लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला पंधरा ते वीस जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुणे येथील हडपसर भागात रहाणाऱ्या एका व्यक्तीला अमोल (पुर्ण नाव माहीत नाही), परमेश्वर काळे,

रामा (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर अज्ञात पंधरा ते वीस जणांनी सांगितले की, आमच्याकडे स्वस्तात सोने देण्यासाठी शिल्लक आहे. असे म्हणुन विश्वास संपादन केला.

या नंतर आरोपींनी जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या परीसरात ३१ मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीस बोलवले. या वेळी बाजुला पंधरा ते वीस जण दबा धरुन बसले होते.

दबा धरुन बसलेल्या आरोपींना सोबत असलेल्या आरोपींनी इशारा करताच ते आरोपी घटनास्थळी आले व फिर्यादी यांनी सोबत आणलेले

रोख रक्कम १० लाख ७ हजार रुपये व ७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असे एकुण १० लाख १४ हजार रुपयांचा ऐवज कोयता व तलवारींचा धाक दाखवून लुटून नेला.

यानंतर दि.८ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा ते वीस आरोपीं विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या आरोपींचा शोध सुरू असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe