मुंबई : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा वेट ॲण्ड वॉचची भूमिका कायम ठेवल्यामुळे मुंबईतल्या तख्तावर कोण बसणार, याबाबतचा सस्पेंस वाढला आहे.
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

त्यांच्याशी टेलिफोनवरही चर्चा केली. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकाही होत आहेत. राज्य विधानसभेची मुदत संपुष्टात येण्यास चोवीस तास आहेत. त्यातल्या शेवटच्या तासावरही आमचा विश्वास आहे.
त्या एका तासातही काही चांगले होईल यावर आमचा विश्वास आहे, अशा शब्दांत त्यांनी गुगली टाकली.
- प्रवरेत रंगला अध्यात्मिक वारी सोहळा टाळ-मृदुंग, जयघोष आणि वारी….
- पाऊस नाही, विहिरी कोरड्या ! गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडा : आ. आशुतोष काळे
- अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! १६ घरफोड्या, २४ लाखांचा मुद्देमाल….
- Ahilyanagar Breaking : अखेर नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह आढळला
- भारताची स्वदेशी ‘धनुष’ तोफ बोफोर्सपेक्षा किती प्रगत आणि घातक? वाचा तिची वैशिष्ट्ये!