अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२८५८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१२ आणि अँटीजेन चाचणीत ११०० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५८, अकोले ६७, जामखेड ०८, कर्जत ३७, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ७४, नेवासा २१, पारनेर ४३, पाथर्डी २१, राहता ७१, राहुरी ०४, संगमनेर ३७, शेवगाव २५, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट बोर्ड ३९, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९२, अकोले १७, जामखेड ०२, कर्जत ०३, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण २१, नेवासा ०९, पारनेर १३, पाथर्डी ०३, राहाता १३२, राहुरी १७, संगमनेर २३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ३१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११४० जण बाधित आढळुन आले. मनपा ८१, अकोले ८७, जामखेड ३९, कर्जत ९५, कोपरगाव ४६, नगर ग्रामीण १०३, नेवासा ३५, पारनेर ८१, पाथर्डी ३५, राहाता ७८, राहुरी १३३, संगमनेर १०, शेवगाव ४५, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर १५७, कॅन्टोन्मेंट बोर्ड ४० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९१, अकोले ३९, जामखेड ०८, कर्जत ९७, कोपरगाव ७७, नगर ग्रामीण ९८, नेवासा ५१, पारनेर ३१, पाथर्डी ५२, राहाता १९०, राहुरी १२६, संगमनेर ९८, शेवगाव २७, श्रीगोंदा ४५, श्रीरामपूर १०५, कॅन्टोन्मेंट ६१, इतर जिल्हा २० आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,०१,९०७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१२८५८
  • मृत्यू:१२८२
  • एकूण रूग्ण संख्या:१,१६,०४७
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe