लासलगाव : परतीचा पावसाने उघडीप दिल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्याने मागणी घटली.
परिणामी लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या (दि.४) तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी टप्प्याटप्प्याने दोन दिवसांत प्रति क्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव ५ हजार रुपयांच्या आत आले. कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्यास उत्पादकांना नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

उन्हाळ कांद्याच्या या हंगामात सोमवारी (दि.४) कांद्याला प्रतिक्विंटल ५७५७ रुपये उच्चांकी दर मिळाला होता. बुधवारी (दि.६) सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची २५५ वाहनांतून २९३४ क्विंटल आवक झाली होती.
त्याला जास्तीत जास्त ४८००, सरासरी ४४५१, तर कमीत कमी २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परतीच्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिल्याने लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १३ वाहनांतून १४६ क्विंटल आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त ३६०१, सरासरी ३००० रुपये, तर कमीत कमी ११०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला
- Sun Pharma Share Price: सन फार्मा शेअरमध्ये 12.80% ची उसळी! SELL करावा का? बघा माहिती
- LIC Share Price: LIC चा शेअर तुमच्याकडे आहे का? पटकन वाचा फायद्याची अपडेट
- आज ‘या’ ऑटोमोबाईल कंपनीचा शेअर रॉकेट! 1 महिन्यात 8% रिटर्न…पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Prestige Estate Share Price: आज ‘या’ शेअरमध्ये 51% ची घसरण! पैसा मातीमोल… तुमच्याकडे तर नाही ना?
- Yes Bank Share Price: 6 महिन्यात 23.75% ची तेजी! आज होईल का फायदा? बघा अपडेट