Maharashtra lockdown : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार ! घोषणा उद्याच ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली.

मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे.

शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स मधील सदस्यांशी चर्चा केली. कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात चौदा दिवसांचा खडक लॉकडाउन लावावा अशी सूचना या बैठकीत टास्क फोस्टमधील बहुतांश सदस्यांनी मांडली.

मात्र मुख्यमंत्री 14 दिवसांच्या लाकडांच्या बाजूने नाहीत. आधीच लॉकडाऊनला राज्यातील काही घटकांचा विरोध आहे. चौदा दिवसांचा लॉकडाऊन लावला तर लोकांचा रोष येईल. अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटते. त्यामुळे सध्या आठ दिवसांचा लॉकडाऊन लावावा अशी भूमिका या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं समजत आहे.

आठ दिवस लॉकडाऊन लावून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर पुन्हा लॉकडाऊन काही दिवसांसाठी वाढवता येईल. मात्र एकदम चौदा दिवसांचा लॉकडाऊन नको अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती मिळते आहे.

ट्रान्सफोर्ट मधील काही सदस्य 14 दिवसांच्या लॉकडाऊनवर ठाम होते तर काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. काहींच्या मते पहिल्यांदा सात दिवस लॉकडाऊन जाहीर करावा पण काहींचे मते जाहीर करताना 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकंदरीत राज्यात 14 दिवस लॉकडाऊन लागणार हे मात्र निश्चित आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे.

कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत.

जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.

आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe