‘रेमडेसिविर’ संसर्ग रोखते, मृत्यू कमी करण्यास उपयुक्त नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-रोखण्यास मदत होते, मात्र मृत्यू कमी करण्यासंदर्भात हे इंजेक्शन उपयुक्त नाही. जागतिक स्तरावरही अशा संदर्भातील कोणताही संशोधन अहवाल नाही.

त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊन इंजेक्शनच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असा सल्ला कोरोना टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिला. डॉ. जोशी म्हणाले, रेमडेसिविरमुळे रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी होतो,

त्यामुळे दुसऱ्याला खाट मिळणे सोपे होते. या इंजेक्शनला दुसऱ्या अँटीव्हायरल औषध इंजेक्शनचाही पर्याय आहे. या इंजेक्शनचा वापर हेपेटायटिसच्या उपचार प्रक्रियेत केला जायचा, त्यानंतर इबोलावर उपचार करण्यासाठी वापरले जायचे.

मात्र या इंजेक्शनमुळे मृत्यू टाळण्यास उपयोग होत नाही. केवळ काेराेनाबाधित रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सध्या यासंदर्भात निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे.

रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठादार आणि डिस्ट्रिब्युटर्सकडी साठ्याची माहिती द्यावी लागेल.

तसेच औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन औषधाच्या साठ्याबाबात कंपन्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी कऱण्याचे निर्देश दिले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe