अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य कांतीलाल घोडके यांचे निधन झाले.कर्जत तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गटाचे ते सदस्य होते.
भाजप पक्षाकडून ते निवडून आले होते. चार वर्षात चार सदस्यांच निधन झाले आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजीराजे गाडे, पाथर्डी तालुक्यातील सेनेचे सदस्य अनिल कराळे,
श्रीगोंदा तालुक्यातील भाजपचे सदस्य सदाशिव पाचपुते, आता कांतीलाल घोडके यांचे निधन झाले. चार वर्षात चार कर्तुत्ववान सदस्यांचे निधन झाले.आपल्या तालुक्यासह झेडपी गटातील विविध प्रश्नांसाठी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित करणाऱ्या सदस्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यामुळे जिल्हा परिषदेची मोठी हानी झाली आहे. सर्व अभ्यास व कर्तुत्व सदस्य असल्यामुळे झेडपीचे मोठे नुकसान झाले आहे.याशिवाय राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप पक्षाची मोठी हानी झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|