वृद्धाला कारमध्ये टाकून नगरच्या बाहेर घेऊन जाऊन लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- पाथर्डीला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवत गुंगीचा स्प्रे फवारून 21 हजार रुपयांना लुटले.

नामदेव विठ्ठल पाखरे (वय 60 रा. वडुले ता. शेवगाव) असे लूट झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नामदेव विठ्ठल पाखरे शनिवारी सकाळी ते माळीवाडा बस स्थानकच्या आऊट गेटला पाथर्डीकडे जाण्यासाठी उभे होते. कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली.

पाखरे यांनी पाथर्डीला जायचे आहे असे सांगितले. तुम्हाला पाथर्डीला सोडतो असे म्हणत लुटारूंनी पाखरे यांना कारमध्ये बसविले.

पाथर्डी रोडने शहापूर शिवारात घेऊन जात त्यांना चाकूचा धाक दाखवून गुंगीचा स्प्रेची फवारणी केली.

त्यांच्या खिशातील 21 हजार रुपयांची रक्कम काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला. पाखरे यांनी पुन्हा नगरमध्ये येत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe