अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोव्हीडच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्क फोर्सने आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे, लॉकडाऊन बाबत विचार करणारे टास्क फोर्सचे अधिका-यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार कला आहे काॽ
असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा आशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शिर्डी येथे अधिकार्या समवेत कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टिका करून लॉकडाऊनच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. सरकारच्या उदासिनतेमुळे रुग्णांना हॉस्पीटल उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन सुविधा नाही.
रेमडीसिव्हर इंजक्शनचा तुटवडा जाणवत आहे.सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री असून अंमलबजावणी मात्र शून्य असल्यामुळेच सरकार सर्व पातळ्यांवर गोंधळले असलयाने कोणताही निर्णय सरकार घेवू शकत नसल्याकडे आ.विखे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
कोव्हीड रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही असे स्पष्ट मत व्यक्त करून आ.विखे पाटील म्हणाले की,लॉकडाऊनचा निर्णय करणाऱ्या टास्क फोर्सचे अधिकारी मंत्रालयात बसून सरकारला सूचना करीत असतील तर ते उचित नाही.
या अधिकाऱ्यांनी कोणत्या जिल्ह्य़ात जावून वास्तव परिस्थिती जाणून घेतली ॽ ग्रामीण भागातील प्रश्नांची मंत्रीमंडळात चर्चा होताना दिसत नाही.
मंत्र्यांची विधान फक्त शहरी भागाची काळजी करणारे दिसतात असे सांगून शहरी भागा बरोबरच लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागाचे मोठे नूकसान होईल याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
यापुर्वीच कोव्हीडमुळे शेतकरी, शेतमजूर कामगार सामान्य व्यापारी बारा बलुतेदार सलून चालक आर्थिक संकटात भरडला गेला आहे.
आता पुन्हा त्यांच्या समोर लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा टास्क फोर्स विचार करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून या सर्व घटकांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे आशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.
कोव्हीड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सिंग रुमच्या नोंदणी केल्या असत्या तर बेडची उपलब्धता होवू शकली असती.
पण जिल्हा स्तरावरील यंत्रणा बेड, ऑक्सीजन, रेमडिसीवीर इंजक्शन यांच्या उपाय योजनांमध्ये अडकुन पडल्यामुळे इतर सुविधांचे सुनियंत्रण करण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
मंत्री थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना आ.विखे पाटील म्हाणाले की, नियतीने आम्हाला विरोधी पक्षात बसयची भूमिका दिली असली तरी, ती आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत.
पण तुम्हाला तर नियतीने मंत्री केले याचा राज्याला आणि जिल्ह्याला काय फायदा झाला असा खोचक सवाल त्यांनी केला.
आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी कोव्हीड काळात केलेल्या कामाचे ऑडीट मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|