अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- मराठी नवीन वर्षाचे उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरा केला जाणार आहे. पण, यंदाच्या वर्षीही गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनचीघोषणा होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.
गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय.
राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत,
तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
गढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील.
तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. दरम्यान राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे.
तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच,
असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|