अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- मागील आठवड्यापासून राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह विदर्भ आणि मराठावाड्याला दिलासा मिळाला आहे.
पण राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कांदा आणि द्राक्षे ही पिकं पडून आहेत.
त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं आहे.
आजही महाराष्ट्रातलं हवामान काही अंशी ढगाळ राहणार आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण विभागातील हवामान स्थिर असून तापमानाचा पारा सरासरी तापमानाच्या खाली गेला आहे. येथील कमाल आणि किमान तापमानातही घसरण पाहायला मिळत आहे.
तर शनिवारी रात्रीपासून पुणे शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण अजूनही पुण्यात अवकाळी पावसाचा धोका कमी झाला नाही.
याठिकाणी आजही अवकाळी पावसाचे काळे ढग घोंघावत आहेत. मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे.
त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अंदाज आहे.
सोमवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ
बुधवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|