गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे राज्यपालांचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे.

त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करतो.

हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.

युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe