अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 194 वी जयंती अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सँन होजे येथे पार पाडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व अमेरिकन मित्र मंडळाच्या माध्यमातून सँन होज येथे एकत्र आलेल्या भारतीयांनी महात्मा फुलेंना अभिवादन केले.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, केतन मेहेता (मुबंई), संजय पटेल (अहमदाबाद), सबजीतसिंग (मुबंई),
अतुल कुमार (बिहार), विश्वनाथन (मुबंई), राजगोपाल (कर्नाटक), वेणू गोपाल (हैद्राबाद), सुब्रमन्यम (हैद्राबाद), आचार्या (आंध्रप्रदेश) आदी भारतीय नागरिक उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, रुढी,
पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन दिली. शिक्षणाची मशाल पेटवून सर्व समाजाला प्रकाशमान केले. आज विविध क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवित असून याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते.
महात्मा फुलेंच्या शिक्षण चळवळीने भारताच्या उज्वल भवितव्याची पहाट उगवली. त्यांनी आपले आयुष्य दीन, दलित व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वाहिले. परदेशात आज भारतीय नागरिक सन्मानाने आपले कर्तृत्वसिध्द करीत असून,
याचे श्रेय देखील महात्मा फुलेंना जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन, आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती परदेशात साजरी केल्याचे स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|