शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. बलसरा यांनी सोमवारी यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

१५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार त्यांना रविवारी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोमवारी पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe