सर्वांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपये त्वरीत जमा करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- ब्रेक द चेनच्या नावाखाली तालुक्यामध्ये लागू केलेला लॉकडाऊन रद्द करून शनिवार व रविवार हे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन करावे व पाच दिवस सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी व जमावबंदी करावी.

अत्यावश्यक सेवांसह सर्व आस्थापनांना व्यवसाय करण्यास संमती द्यावी, या मागणीसाठी काल श्रीरामपूर प्रशासकीय इमारतीत विविध पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र कमगार कर्मचारी युनियन मुंबई, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, मराठा स्वयंसेवक संघ, समाजवादी पार्टी, आदिवासी पार्टी समाज संघ, रिक्षा युनियन, हॉकर्स युनियन, संत सेना महाराज नाभिक संघटनेमार्फत काल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

त्यात म्हटले, की प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनांना बंद करण्याबाबत आदेश काढून दुकाने सुरु राहिल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचा दिलेला आदेश रद्द करण्यात यावा.

लॉकडाऊन मागे न घेतल्याने विविध व्यवसायांतील कामगारांची उपासमार सुरू झाली आहे. छोट्या व्यावसायिकांबरोबरच कामगारांतही या मिनी लॉकहाऊनमुळे नाराजी पसरलेली आहे.

तसेच बीपीएल, एपीएल, अन्नसुरक्षा व केसरी कार्डधारकांना पंतप्रधान कल्याण योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून मानसी ५ किलो मोफत धान्य देण्यात यावे, उ द्योगधंदे बंद झाल्याने वीजवितरण कंपनीने वीजबिलाची या कालावधीमध्ये आकारणी करा नये

व भावी काळात या मिनी लॉकडाऊनमधील वीज बिलाच्या वसुलीची सक्ती करु नये, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपये त्वरीत जमा करून बँका, वित्तीय संस्था यांनी या कालावधीमध्ये कोणतीही वसुली, तसेच व्याजाची पठाणी वसुली करा नये.

या कालावधीत विविध स्वरुपाचे कर वसूल करण्यात येवू नये, श्रीरामपूर शहर व परिसरामध्ये सर्वच ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र व कोविड सेंटर सुरु करण्यात यावे.

रेमडेसिव्हीर या लसीचा होत असलेला काळा बाजार थांबवून, लसीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, लसीचा पुरवठा करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe