शिरुरमध्ये मुन्नाभाई डॉक्टर : कपांऊडरने सुरू केले चक्क २२ बेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये कपांऊडर असलेल्या मेहबूब शेख याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी हे २२ बेडचे रुग्णालय सुरू केलं.

त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि डॉ. महेश पाटील असे नावही बदलले होते. विशेष म्हणजे त्याने कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता.

संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख आहे. तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं.

याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, त्याने बनावट डिग्री आणि आधार कोठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत.

महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,असं घनवट यांनी सांगितलं.

याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe