अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- ज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यांन काल पंढरपूर येथील सभेत सरकार कधी पाडायचं, ते माझ्यावर सोडा असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं.
त्या वक्तव्याचा आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. फडणवीसांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख ठरवली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
दरम्यान संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच.
त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख ठरवली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.
तसेचं यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी लादली आहे. त्याबद्दल संताप व्यक्त केला. महाभारताचंही युद्ध लढलं गेलं.
त्यावेळी शिखंडीला पुढे करून युद्ध लढलं गेलं. पश्चिम बंगालमध्येही युद्ध सुरू आहे. पण पश्चिम बंगालचे शिखंडी कोण आहेत? त्याचा शोध घेतला पाहिजे.
कोणत्या शिखंडींना पुढे करून बंगालमधील युद्ध लढलं जातंय हे पाहावं लागेल, अशी टीका राऊत यांनी केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|