अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-एप्रिल ते जुलै या काळातील सन्मान निधीचा हप्ता राज्यातील ९८ लाख शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत वितरीत होईल, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या निकषांनुसार अपात्र असलेल्या राज्यातील तब्बल चार लाख ९१ हजार ६८६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३३७ कोटींची रक्कम वितरीत झाली आहे.
आता या शेतकऱ्यांकडून वसुलीची कार्यवाही सुरु झाली असून त्यापैकी ८१ कोटींची वसुली करण्यात आली असून उर्वरित रकमेची वसुली सुरु आहे.दरम्यान, शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे सहा हजार रूपयांची मदत केली जाते.
राज्यातील एक कोटी दोन लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला पाठविण्यात आली.डिसेंबर ते मार्च या काळात पहिला तर एप्रिल ते जुलैदरम्यान दुसरा आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालवधीत शेवटचा हप्ता मिळतो.
केंद्र सरकारच्या निकषांनुसार अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांनाच दरवर्षी सहा हजारांचा सन्मान निधी वितरीत केला जातो.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|