अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सुवर्ण खरेदीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे पाणी फेरले आहे.
मुंबई, जळगाव यासह महत्त्वाच्या सराफा बाजारपेठांमध्ये सुवर्ण व्यवसाय ठप्प राहिल्याने दुकानांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
सोन्याच्या किमतीत घसरण झाली असली तरी ग्राहकांनादेखील सोने खरेदीपासून वंचित राहावे लागले. परिणामी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन विक्री देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही पाडव्याला लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने त्याचा फटका वाहन उद्योगालादेखील बसला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|