अहमदनगर ब्रेकिंग : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्यां २ जणांविरुद्ध गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-रेमडेसिवीर या इंजेक्शन औषधाचा काळा बाजार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून मोटारसायकल व मोबाइल असा १ लाख १० हजारांचा ऐवज तसेच त्यांच्या बॅगेत असलेली २६ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवारी रेल्वे कॉलनीतील एका युवतीच्या वडिलांसाठी रेमेडीसीवीर इंजेक्शन हे औषध मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तिला जास्त किंमतीने दोघेजण औषध देणार असल्याची माहिती संजय रूपटक्के यांंना मिळाली.

त्यांनी त्यांचे मित्र गणेश जायगुडे, सोमनाथ कदम यांंना घेऊन तिला इंजेक्शन घेण्यासाठी पैसे नेऊन दिले. तेथेच थांबून सोमनाथ कदम याने श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन पोलिस कॉन्स्टेबल नरवडे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.

त्यानंतर नरवडे व पोलिस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी हे तेथे आले. त्यांनी पाळत ठेवून या दोघांंना साखर कामगार हॉस्पिटलच्या भिंतीजवळ बाहेरील बाजुस मोटारसायकलवरून येताना पाहिले.

त्यावेळी त्यांनी त्या तरुणीला ४ हजार ८०० रुपये किंमतीचे इंजेक्शन औषध २० हजार रुपये किंमतीस विकत असताना पकडले. त्यातील एक़ास चाहूल लागताच तो पसार झाला होता.

मात्र, त्यालाही पकडण्यात यश आले. पकडलेल्या व्यक्तीने नाव शुभम श्रीराम जाधव, रा. कोल्हार, ता. राहाता असे असल्याचे सांगितले. पळून गेलेल्याचे नाव प्रवीण प्रदीप खुने, रा. भातंबरी, ता. बार्शी, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले.

येथील एका डॉक्टरकडे वॉर्ड बॉय म्हणून तो काम करत असल्याचेही सांगितले. त्यानेच मला रेमेडीसीवीर इंजेक्शन विक्रीसाठी आणून दिले, असे सांगितले.

त्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी दोन पंचांना बोलावून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेले ४ हजार ८०० रुपयाचे बॉक्समध्ये रेमेडीसीवीर इंजेक्शन त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर असलेली काचेची बाटली,

५० हजार रुपये किमतीची एमएच २३ एएम ०९३३ या क्रमांकाची पल्सर मोटारसायकल, ६० हजार रुपये किंमतीचा वन प्लस एट प्रो कंपनीचा मोबाइल, २६ हजार ८०० रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली.

त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe