अहमदनगर जिल्ह्यात रेमडिसिव्हीर व ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने 24 X 7 कंट्रोल रूम !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-जिल्हयामध्ये कोरोना बाधीत रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कोरोना बाधीत रुग्ण व नातेवाईक

यांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे 24 x 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आली आहे.

या कंट्रोल रुमचा दूरध्वनी क्रमांक 0241-2322432 आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक अधिकारी म्हणून श्री. कातकडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर हे आहेत.

नागरीकांनी जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सीजन पुरवठा सुरळीत मिळणेकरीता या कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. ही कंट्रोल रुम 24X7 सुरु राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी कळविले आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe