अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील ममदापूर येथील जाहेद अरबाज शेख या दीड वर्षीय मुलावर दोन दिवसांपूर्वी गावातील भटक्या कुर्त्यांनी हल्ला केला होता.
त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिवारासह गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलगा आईसोबत आजोळी ममदापूरला आला होता.जाहेद शेख हा मुलगा रविवारी संध्याकाळी सहा वाजता घरासमोर अंगणात खेळत होता.
अचानक कुर्त्यांचे टोळके त्या मुलाकडे धावत आलेव त्याला काही अंतरावर ओढत नेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
घरच्या महिलांसह शेजारील नागरिकांनी कुर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु या हिंसक टोळक्याच्या आक्रमकतेपुढे त्यांचेही काही चालले नाही. घटनेनंतर मुलाला ताबडतोब लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले;
परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यास अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. या ठिकाणी दीड दिवस उपचार घेऊन अखेर या चिमुरड्याची प्राणज्योत मावलली.
या भागातील ही घटना नवीन नसून याआधीदेखील लहान मुलांवर कुर्त्यांनी प्राणघातक हल्ले केले आहेत. यात आधीही दोन लहान मुलांनी आपले जीव गमावले आहेत. या कुर्त्यांनी अनेक शेळ्यांना ठार करणे ही नित्याची बाब आहे.
ग्रामपंचायत तथा पंचायत समिती आरोग्य विभागाने त्वरित या भटक्या कुर्त्यांचा बंदोबस्त करावा व हे प्रकार का घडतात, याची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याचे नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी ठरवले आहे. अजून किती मुलांना आपला बळी द्यावा लागणार? असा प्रश्न आता येथील नागरिक विचारू लागले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|