महापौर म्हणतात शहरातील नागरिकांनी घाबरू नये !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात रूग्‍णसंख्‍या वाढत आहे.

नगर शहर हे मुख्‍यालयाचे ठिकाण असल्‍यामुळे जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी  नगर शहरामध्‍ये येत असतात.

दुर्दैवाने काहींचा मृत्‍यू होतो. मात्र ‘त्या’ कोरोना रूग्‍णावर नगर शहरामध्‍ये अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे. तरी शहरातील नागरिकांनी घाबरून जावू नये.

कोरोना रूग्‍णांचा अंत्‍यविधी करणे आपले कर्तव्‍य आहे. या मानव भावनेतून आपण केडगांव अमरधाम, रेल्‍वे स्‍टेशन अमरधाम , नागापूर अमरधाम येथे सुविधा उपलब्‍ध करू असेही महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले.

शहरातील नालेगांव अमरधाम स्‍मशानभूमीमध्‍ये दररोज मोठया प्रमाणात कोरोना बाधीत रूग्‍णांचे अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये घबराट पसरलेली आहे.

कोरोना मृत्‍यू झालेल्‍या नागरिकांच्‍या अंत्‍यविधीसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. रूग्‍णवाहिकांच्‍या लागलेल्‍या रांगाचा फोटो ,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाल्‍यामुळे नगर शहरामध्‍ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे तांडव नागरिकांमध्‍ये जावून नागरिक भयभित होत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पाहणी करून अंत्‍यविधी करण्‍यासाठी नेमणूक केलेल्‍या संस्‍थेच्‍या संचालकाशी चर्चा करून माहिती घेतली. यामध्‍ये मोठया प्रमाणात वयोवृध्‍द नागरिकांचा दुदैवी मृत्‍यू झाला आहे.

याच बरोबर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांचा समावेश आहे. यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.

शासनाने दिलेल्‍या नियमाचे पालन करून कोरोनावर मात करण्‍यासाठी सहकार्य करावे अत्‍यावश्‍यक काम असल्‍यासच घराबाहेर पडावे,

विनाकारण शहरामध्‍ये फिरून निष्‍पाप नागरिकांना कोरोनाची लागण होईल असे वर्तन करू नये  असे आवाहन त्यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe