अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर-बाभळेश्वर या राज्य मार्गावरील ममदापूरनजीक ट्रक व मोटरसायकल यांचा अपघात होऊनयामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि श्रीरामपूरकडून ट्रक क्रमांक एमएच 12-एच बी 4001 हा बाभळेश्वरकडे जात असताना यादव मळा-ममदापूरजवळ असणार्या
टिळेकर वस्तीजवळ या ट्रकने बाभळेश्वरकडून येणार्या दुचाकी क्रमांक एम एच 12- डि, क्यू, 6149 या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात राजेंद्रकुमार बाबूलाल रामकिसन गुजर, राहुल मेहरा हे मोटरसायकलस्वर जबर जखमी झाले.
हुल मेहरा व रामकिसन गुजर या दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने या जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता उपचार सुरु असताना दोघांचाही मृत्यू झाला.
या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर सदरचा ट्रक दोनशे फूट लांब अंतरावर उसात जाऊन थांबला.
हे अपघातग्रस्त व्यक्ती श्रीरामपूर येथे फरशी बसवण्याचे काम करत होते. आजपासून सुरू होणार्या लॉकडाऊनमुळे हे तिघेही आपल्या राजस्थान, जयपुर गावी जाण्यासाठी निघाले होते;
परंतु त्यांना गाडी न मिळाल्यामुळे ते पुन्हा बाभळेश्वरकडून-श्रीरामपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.यानंतर ट्रक चालक व क्लिनर तेथून पसार झाले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|