अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-राज्यात बुधवार दि.१४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्यानुसार पंधरा दिवसाच्या अवधीसाठी नव्याने निर्बंध जारी झाले आहेत.
हे निर्बंध जिल्ह्यात लागू करण्यात आले असून याच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील काल गुरुवार रोजी फिल्डवर उतरले होते.
संचार बंदीचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्यांना थेट विचारणा करीत जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देखील दिली. तसेच निर्बंधाच्या अंमलबजावणीचे निर्देश देखील जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले. मागील वर्षीच्या दिवाळी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव घटला होता.
त्यामुळे राज्यात मिशन बिगेन अगेन अनुसार एक एक निर्बंध खुले करण्यात आले. मात्र, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा उफळी घेतली. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
मागील पंधरवड्यात प्रतिदिवशी कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांच्या घरात पोहचला आहे. राज्यातही पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारासह अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनांक १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी
संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा वगळून इतरांसाठी संचारबंदी जारी केली. मुख्यमंर्त्यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सुधारित प्रतिबंधात्मक आदेश बुधवारी जारी केले आहेत. काल गुरुवार रोजी या निर्बंधाचा पहिलाच दिवस होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी भोसले यांनी घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,
महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे, स्वीय सहायक सुरेश आघाव आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|