पत्रकार दातीर हत्या प्रकरणाचा तपास आता डिवायएसपी मिटकेंकडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनातून काढून घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता हा तपास थेट श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे नक्कीच तपासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. पत्रकार दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते.

त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 व त्यात वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी( वय 25 वर्ष ,राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी)

व तौफिक मुक्तार शेख (वय 21 वर्ष, राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती .

तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार असून सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून गुन्ह्याचा तपास काढून पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राहुरी पोलीस तपासात अपयशी ठरत असल्यानेच हा तपास काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिल्याचे बोलले जात आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News