अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या काळात कोणीही राजकारण न करता सर्वांच्या सहकार्याने या महामारीवर आपण मात केली पाहिजे.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सर्वांना हॉस्पिटलची गरज आहे, सर्वांनाच उपचार मिळाले पाहिजे,अशी भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडली.
शिर्डीत बाहेरच्या रूग्णांना प्रवेश देऊ नये या विखेंच्या भूमिकेवर खासदार लोखंडे यांनी आपले मत मांडले.
तसेच लोणीत व विळद घाटात गरीब कोरोना रूग्णांवर मोफत उपचार मिळावे यासाठी आपण खासदार सुजय विखे व आमदार राधाकृष्ण विखे यांना विनंती करणार असल्याचेही खा. लोखंडे यांनी सांगितले.
खा.लोखंडे यांनी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रितम वडगावे, कोविड सेंटर प्रमुख डॉ. मैथली पिंताबरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. घोगरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली.
शिर्डी संस्थानकडे सध्या ७० ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे. बैठकी दरम्यान अजून १५० बेड उपलब्ध करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.
यासाठी कमी पडणाऱ्या ऑक्सिजनसाठी आपण मुख्यमंत्री व पालकमंर्त्यांशी बोलणार असल्याचेही खा. लोखंडे यांनी सांगितले.
तसेच कोरोना बाधित दोन हजार रूग्णांची साई आश्रममध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. लक्षणे दिसल्यास तत्काळ रूग्णांनी टेस्ट करण्याचे आवाहन खा.लोखंडे यांनी केले आहे.
जेणे करून आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. रेमडिसीव्हर इजेंक्शन सध्या १०० उपलब्ध करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने वाढती मागणी पाहून निर्यात थांबवली आहे, त्यामुळे चार ते पाच दिवसात इंजेक्शनची उपलब्धता होणार असल्याचीही माहिती खा. लोखंडे यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|