अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- स्वस्तात गोडेतेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवत दरोडा घालणारे व मोक्काच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेले आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली राहूल नेवाशा भोसले, (२२, रा. वाळकी, ता. नगर), दगू बडोद भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) व उरुस ज्ञानदेव चव्हाण (रा. वाळकी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी हर्षल शिवशंकर चौधरी (३१, रा. अकलूज, जि. सोलापूर) यांना आरोपी जाधव (रा. खडकी, ता. नगर) याने व त्याचे साथीदारांनी स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे अमिष दाखवले.
फिर्यादी यांना घोसपुरी शिवारातील निर्जन स्थळी बोलावून घेवून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम, मोबाइल असा ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तसेच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेन्द्र सानप, जारवाल, आबनावे यांनी हा गुन्हा घडले ठिकाणी भेट दिली.
आरोपींचा शोध घेत असताना कटके यांना माहिती मिळाली की हा गुन्हा राहूल भोसले व त्याच्या साथीदारांनी केला आहे. त्यानुसार पथकाने वाळकी येथे जावून आरोपीला ताब्यात घेतले.
सहायक निरीक्षक मिथुन घुगे, गणेश इंगळे, संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, प्रकाश वाघ, आकाश काळे यांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
त्याला विश्वसात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. हा गुन्हा त्याचे साथीदारासह केला असल्याची कबुली दिली
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|