अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेवगाव तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व्हॉटस् अप ग्रुपचा सकारात्मक वापर करीत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू असलेल्या
शेवगावच्या कोविड केअर सेंटरच्या मदतीसाठी गेल्या दोन दिवसांत दोन लाख रूपयांहून अधिक निधी गोळा केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गंभीर रुग्णांची हेळसांड होऊ नये
तसेच बाधित रुग्णांना नगर व इतर शहरात उपचारासाठी जावू लागू नये व या दृष्टीने तालुका प्रशासनाने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात १५० बेडचे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथे ७५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
मुलभूत व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची अडचण असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी केले होते.
त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी समाजमाध्यमाचा सकारात्मक वापर करत सुमारे एक लाख रूपयांची मदत गुरुवारी जमा केली.
तर शुक्रवारीही एक लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या मदतीतून गोरगरिब व गंभीर रुग्णांना चांगले उपचार मिळून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांच्याकडे ही मदत शिक्षकांनी जमा केली आहे. ही मानवतावादी कृती समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवणारी व सर्वच तालुक्यांनी अनुकरण करावी अशी आहे, असे शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|