अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-पञकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
श्रीरामपुर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने मोरे यास नेवासा हद्दीतून ताब्यात घेतले आहे. राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केलं होतं त्यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय कुलथे हे गेले बारा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. सदर हत्या प्रकरण माञ राज्यामध्ये गाजत होतं.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे यांनी सदर पीडित कुटुंबियांची भेट घेऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी देखील केली होती.
तर काही दिवसातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार होते.त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते.
नंतर हत्या प्रकरणाचा तपास देखील राहुरी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून काढत डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला होता.
आज रविवारी यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा नेवासा भागात दडुन बसला असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती.
रविवारी राञी मोरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे आता हत्या नेमकी कुठल्या कारणातून झाली यामधे कोन-कोन सहभागी होते हे पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे.
सदर पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख, हवालदार सुरेश औटी,रविंद्र मेढे,नितीन चव्हाण, नितीन शिरसाठ आदिंचा सहभाग होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|