अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी मध्ये मोठी भर पडत आहे.
याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कडक नियमांची अंलबजावणी करण्यात येत आहे. मात्र तरी देखील नागरिकांची बेफिकीरी वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे.
रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पथकासह गस्त घालत नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी मास्क न घालणारे, तसेच एका ठिकाणी बसून भाजीपाला विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
या पथकाने दिवसभरात ३५ जणांवर कारवाई करत २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, कॉटेज कॉर्नर परिसरात एका ठिकाणी घराच्या कंपाउंडचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी काही मजूर त्या ठिकाणी काम करत होते.
कडक निर्बंध लागू असल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार व कामास सध्या बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर जागा मालकावर दंडात्मक कारवाई केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|