अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- श्रीरामपुरातील एका रुग्णाला अर्जंट रेमडेसीवीरची आवश्यकता असल्याने रुण्गाचे नातेवाईक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेत होते.
त्या दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकाला रईस अफजल शेख(वय-२०,राहणार-मातापुर ता.श्रीरामपूर) याने संपर्क करुन रेमडेसीवीर देतो असे सांगितले.
परंतु पेशंटच्या नातेवाईकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना सांगितले.त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दि.१८ रोजी सायंकाळी ०५ वाजता रईस शेख याला ओव्हर ब्रीज जवळ,श्रीरामपूर येथे ताब्यात घेतले.
त्याच्याकडून बनावट रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांनी रईस शेखकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की,
डाॅक्टरांनी वापरुन कचराडब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडीसीवीर इंजेक्शन मध्ये तो सलाईन मधील पाणी भरुन विकायचा. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रईस शेखने असे किती बनावट इंजेक्शन अडचणीत असलेल्या कोरोना पेशंट च्या नातेवाईकांना विकले ?
यामुळे कोणी कोरोना पेशंट दगावले का? याचा तपास श्रीरामपुर पोलीस करत आहे. सुदैवाने श्रीरामपुरातला या पेशंट च्या नातेवाईकाला पोलिसांमुळे ही बाब कळाली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|