अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल केले आहे.
देशातील कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
त्यात त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला देखील दिला आहे. या पाच कलमी कार्यक्रमात, पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे
२. राज्यांना अपेक्षित असेलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत ३. राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.
४. लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या ५. वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या मुद्यांचा समावेश आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|