‘या’ तहसीलदारांच्या वाहनाचा अपघात!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे -भाकड यांच्या खासगी वाहनाला अपघात होऊन यात त्या जखमी झाल्या आहेत.

हा अपघात माका येथील खार्‍याचा ओढा येथे घडला. याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे या त्यांच्या खाजगी वाहनाने शेवगाव येथे जात होत्या.

त्या स्वतः वाहन चालवत येत असतांना माका ते निंबेनांदूर रस्त्या दरम्यान असलेल्या खार्‍या ओढ्याच्या वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची कार थेट ओढ्यात गेली.

यावेळी आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात तहसीलदार किरकोळ जखमी झाल्या आहेत.

उपस्थितांनी त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविणले. दरम्यान त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe