अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी केली नाही, तर आणखी कडक नियम लादून भाजी मार्केट बंद करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी डॉ. भोसले बोलत होते.
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, राज्य व जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अतिशय गंभीर आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, प्रशासनाला कठोर पावले उचलावे लागतील. वाढती रुग्णसंख्या पाहता दुचाकीवर एकालाच परवानगी राहणार आहे.
प्रत्येक खाजगी रुग्णालयातील मेडिकलमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. रेमडीसिवीर म्हणजे एकच पर्याय नाही, त्याला इतरही पर्याय असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना त्यासाठी बाहेर पाठवू नये.
नागरिकांनी अजूनही कोरोनाला अद्यापही गांभीर्याने घेतले नाही, त्यांनी आजची परिस्थिती लक्षात घ्यावी. ही दुसरी लाट आहे. बेडही शिल्लक नाहीत. त्यात तिसरीही लाट येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|