केज –
दोन महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून एका २८ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली.
शिवकन्या सोमेश्वर रत्नपारखी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. युसूफवडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.
बनसारोळा येथील रामभाऊ सुवर्णकार यांची कन्या शिवकन्या हिचा पाच वर्षांपूर्वी भुईसमुद्र (जि. लातूर) येथील सोमेश्वर रत्नपारखी यांच्यासोबत विवाह झाला होता.
तिला चार वर्षांची एक मुलगी असून छोट्या मुलाचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून शिवकन्या सावरली नव्हती.