प्रियंका गांधी म्हणतात, देशवासियांना लसीकरणासाठी प्राधान्य का नाही? तुम्ही तर प्रसिद्धीत व्यस्त…

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली.

सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली.

तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही? कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात, अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली. ऑनलाइन मुलाखतीत त्या बोलत होत्या.

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसंच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचे गांधी म्हणाल्या.

मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

देशात कोरोनाने कहर केला असताना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे.

तसंच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचं सांगताना देशवासियांना प्राधान्य का देण्यात आलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे.

मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही, अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe