अहमदनगर ब्रेकिंग : खासदारावर गुन्हा दाखल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- उत्तर नगर जिल्हयातील निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले,मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे.

या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले.

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे.

पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो.या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे.

खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

खा.लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते. कोणत्याही जबाबदार अधिकार्‍यांची परवानगी न घेता खा.सदाशिव लोखडे,नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके,शिवाजी शेळके, विलास गुळवे,

प्रभाकर गायकवाड आदींनी उद्घाटनासाठी एकत्र येऊन जिल्हाधिकार्‍यानी लागु केलेल्या जमावबंदीचे उल्लघनं तसेच साथरोग कायदयाचे उल्लघंन केल्या प्रकरणी लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News