पहिला डाेस घेतल्यानंतर २१ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ हजारहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला असून दुसरा डोस घेऊनही ५,५०० जण बाधित झाले आहेत.

केंद्र सरकारने बुधवारी ही माहिती दिली. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले, आतापर्यंत ९३ लाख लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला.

यातील ४,२०८ जणांना संसर्ग झाला. सुमारे १० कोटी लोकांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला. यातील १७,१४५ लोकांना संसर्ग झाला.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतलेल्या १७,३७,१७८ लोकांपैकी ६९५ लोकांना संसर्ग झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|