अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-जिल्हा बँकेच्या विविध शाखेत अनेक कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आले असून, यामध्ये ७ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँकेच्या कामकाजाची वेळ बदलण्याच्या मागणीचे निवेदन कर्मचारी संचालक अशोक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड. उदय शेळके यांना दिले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. काही कर्मचारी बरे झाले असून, काहींवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
कोरोनाच्या महामारीत जिल्हा बँक जामखेड शाखेचे ३, कोपरगाव शाखेचे २, पारनेर शाखेत १ तर मुख्य कार्यालयातील १ कर्मचारी असे एकूण ७ कर्मचारी कोरोनाने मृत्यूमुखी पडले आहेत.
लॉकडाऊनमुळे बँक व्यवहार कमी झाले असून, नागरिक कमी संख्येने येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|