अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती.
परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे.

इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे.
या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावली अंतर्गत सरकारने कडक नियम लागू केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर