विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षांबाबत झाला मोठा निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राज्यात करोना परिस्थिती पाहता राज्यात लॉक डाऊन लावण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आता राज्यातील कठोर निर्बंध लक्षात घेता कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तेरा विद्यापीठांच्या सर्व उर्वरित परीक्षा ऑनलाईन होणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की,

‘ विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. आज कुलगुरू सोबत परीक्षा संदर्भात बैठक झाली.

तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरू होत्या आता उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल असा निर्णय झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना प्रमाणपत्रं मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांच्या भवितव्यातील शिक्षणात अडचणी येणार नाही, त्याला प्राधान्य असेल असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. त्यामुळे निकाल लवकर लागेल व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe