राहुरीत ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, मुळा धरणाच्या पाण्यात मारली उडी

Ahmednagarlive24
Published:

राहुरी शहर –
राहुरीतील मुळा धरणाच्या पाण्यात अज्ञात ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या तरुणाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

मुळा धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी या घटनेची खबर राहुरी पोलिसांना दिली. 

पोलिस काॅन्स्टेबल प्रवीण खंडागळे यांनी घटनास्थळी जावून सागर अशोक नवसारे व मोसिन बशीर शेख यांच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. 

हा तरुण शुक्रवारी दुपारी प्रवेशद्वाराजवळील दत्तमंदिर परिसरात थांबला होता. या तरुणाच्या हातात लाल पिशवी व पाण्याची बाटली होती. स्थानिक गावकरी काही मदत हवी आहे का, अशी विचारणा केली होती. 

मात्र, त्याने धरणावर फिरायला आल्याचे सांगितले होते. मुळा धरणावर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,पाण्याजवळ धोकादायक फलक, तसेच प्रवेशद्वारा जवळ पोलीस बंदोबस्त असताना देखील आत्महत्येच्या घटना सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment