चीन म्हणतो, कोरोनाच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी तयार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवांचे शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या संकटाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

कोरोना संकटाच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी आपण तयार आहोत, असे भारताविरोधात वेगवेगळे कट रचणाऱ्या चीनने म्हटले आहे.

भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता.

यावेळी चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे, असं वांग वेनबिग यांनी म्हटले आहे. याबातबचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आपल्या सर्वांचं लक्ष्य कोरोनाला हरवणं आहे आणि यासाठी शेजारी देशांना मदत करण्याची आमची तयारी आहे. भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे.

तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असे वांग म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe